बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज ठरणार टेस्टचा बादशाह; राखीव दिवशी सामन्याची चुरस वाढली

नवी दिल्ली | जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सध्या इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. भारत आणि न्युझीलंडमध्ये हा सामना खेळवला जात आहे. या फायनल सामन्याचा पहिला दिवस पाण्याने वाया गेला होता. त्यानंतर 4 दिवस पुर्ण खेळ होईल, अशी अपेक्षा होती. पण पावसाने पुन्हा खोळंबा करत सामन्याची चिंता वाढवली आहे. पण सामन्याच्या 5 व्या दिवशी सामना खेळला गेल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये पुन्हा उत्साह वाढला आहे.

पावसामुळे झालेल्या खोळंब्यामुळे या अंतिम सामन्याच्या शेवटच्या सहाव्या, राखीव दिवसाचा खेळ होणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला जर सामना टाय किंवा अनिर्णित करायचा नसेल तर त्यांना आता टी-20 प्रमाणे फलंदाजी करत मोठं आव्हान उभं करावं लागणार आहे. सध्या भारतीय संघाच्या दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले आहेत. भारताचे समालवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल दोघेही बाद झाले आहेत. सध्या भारताकडे केवळ 32 धावांची लीड आहे.

आज पावसाने गोंधळ घातला नाही तर, सामना रोमांचित होण्याची शक्यता आहे. आज टी 20 अंदाजात फटकेबाजी पाहायला मिळू शकते. पाऊस उघडला असल्यानं मैदानातील क्राक्स उघडे पडले आहेत. त्यामुळे आता फलंदाजांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. भारताला पहिल्या सत्रात आज कमीतकमी 300 च्या वर धावांचं लक्ष न्यूझीलंडला द्यावं लागेल. फलंदाजीची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे.

दरम्यान, सहाव्या दिवशी साऊथम्पटन मधील आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी अगदी कमी किंवा कोणत्याही प्रकारचा पाऊस पडणार नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्सना दोन दिग्गज टीममधील थरारक झुंज सहाव्या दिवशी शेवटच्या बॉलपर्यंत अनुभवता येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब- जितेंद्र आव्हाड

…हा तर ओबीसींवर घोर अन्याय; आम्ही याविरूध्द न्यायालयात धाव घेणार- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More