बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरज चोप्राच्या भाल्याची लागली कोट्यवधींची बोली; किंमत ऐकून व्हाल थक्क

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू 17 सप्टेंबर रोजी लिलावात निघाल्या. या भेटवस्तूंच्या ई-लिलावात बोली लावायची मुदत गुरूवारी संपुष्टात आली. पंतप्रधान मोदींना देश विदेशातील पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू या लिलावात निघाल्या. पण या लिलावात सगळ्यात जास्त बोली लागली आहे ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या भाल्यासाठी.

भारताचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सर्वाधिक अशी 1 कोटी 50 हजार रूपयांची बोली लागली आहे. नीरज चोप्राच्या भाल्यासाठी लागलेली बोली ऐकून सगळेच आवाक झाले आहेत. तर नीरज पाठोपाठ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेला भारताचा खेळाडू सुमित अंतील याने वापरलेल्या भाल्यासाठी 1 कोटी 20 हजारांची बोली लागली आहे.

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या ऐतिहासिक भेटवस्तूंसह ऑलिम्पिक खेळाडूंच्या वस्तूंना या ई-लिलावात जास्त मागणी होती. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या कृष्णा नागरच्या बॅडमिंटन रॅकेटला 80.15 लाखांची बोली लागली आहे. अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराची लाकडी प्रतिकृतीही मोदींना भेट म्हणून मिळाली होती. यासाठी अडीच लाख रूपयांची बोली आहे.

तर मोदींना मिळालेल्या राम,लक्ष्मण, सिता आणि हनुमानाची एकत्रित मूर्ती विकत घेण्यासाठी 1.35 लाखांची बोली लागली आहे. या लिलावातून जमा होणारा सगळा निधी नमामी गंगे प्रकल्पाला देण्यात येणार आहे. ही सगळी माहिती पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून कोरोनाची तिसरी लाट ठरु शकते भयावह, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

नातेवाईकांना रेल्वे फलाटावर सोडायला जाताय?, तर ही बातमी एकदा वाचा

मुंबईच्या अडचणी वाढल्या! कोलकाताने राजस्थानला केलं चारी मुंड्या चीत

पार्टीच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; आर्यन खानने केला मोठा खुलासा!

‘पुढील 3 महिने अधिक महत्त्वाचे’; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा गंभीर इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More