बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! चारा आणायला गेलेल्या 2 भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

जालना | मन सुन्न करणारी घटना जालन्यात घडली आहे. विजेचा धक्का लागून दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडीत घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पवन गजानन घोडे आणि सचिन रामकीसन घोडे अशी या दोन मयत भावंडांची नावं आहेत. लिंगेवाडीसह भोकरदन तालुक्यात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडणं शक्य नव्हतं. यामुळे ते चारा आणायला गेले.

शेजाऱ्यांनी आरडा-ओरडा करत त्यांची सुटका केली. त्यानंतर दोघांना तत्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  यानंतर डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केलं. दोघांवरही ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. यानंतर लिंगेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे लिंगेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातही आज काही ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 10 ते 16 सप्टेंबर या कालावधीत मात्र परतीच्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“आता दयामाया नाहीच, फेरिवाल्यांचा उच्छाद अटोक्यात आणावाच लागेल”

“बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटले, हे दु:ख टोचणारं”

“आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘….तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का?’; मायावतींचं भागवतांवर टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More