पुणे महाराष्ट्र

पुण्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आठ जणांचे बळी

पुणे | पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतच चाललं आहे. बुधवारी सकाळी पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

आज दिवसभरात पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या 16 झाली आहे. पुण्यात आज सकाळपासून पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

नायडू रुग्णालयात 1, नोबेल रुग्णालयात  1 आणि ससून रुग्णालयात 3 अशी एकूण 5 जणांच्या मृत्यूची नोंद  झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली होती.

पुण्यात सकाळपासून 25 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 154 वर पोहोचली आहे, अशी माहिती महापौर मुलधीर मोहोळ यांनी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

“लोकहो, घरात व्यायाम करा, ज्यांना त्रास आहे त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवा; आपल्याला युद्ध जिंकायचंय”

“केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको”

महत्वाच्या बातम्या-

“राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 1135, महाराष्ट्र अद्याप स्टेज 3 मध्ये नाही”

‘माझ्यावर प्रेम असेल तर एवढचं करा…’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच आवाहन

लॉकडाऊन काही भागात शिथील करता येईल का?, पवारांची मोदींना विचारणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या