खासदार उदयनराजे यांच्या पदाधिकाऱ्यांना हटके शुभेच्छा

सातारा | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेतील नवीन पदाधिकाऱ्यांना हटके शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या शुभेच्छांची सध्या चांगलीच चर्चा आहे. 

सातारा नगरपालिकेत उदयनराजे भोसले यांनी नुकताच खांदेपालट केला. सभापती आणि विषय समित्यांचे सदस्य बदलण्यात आले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते नगराध्यक्षांच्या दालनात पोहोचले होते.

उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारल्या तसेच त्यांना काही सूचनाही केल्या. मात्र शुभेच्छा देण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं, त्यावेळी त्यांनी चक्क फ्लाईंग किस दिला आणि ‘लव्ह यू ऑल’ असं ते म्हणाले.