बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे आणि भावना गवळी यांच्यामागे अंमलबजावणी संचालनालयाचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात असतो.

महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी आता यंत्रणांना न घाबरता तपास यंत्रणांच्या विरूद्ध लढा देण्याची तयारी केली आहे. याविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा विरोध करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना राऊत यांनी केलं आहे. भाजप दबावाचं राजकारण करत आहे. भाजपचे नेते रोज कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आरोप करत असतात. फक्त मी एकट्यानं बोलण्यापेक्षा इतर काही जणांनी बोलणंही गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काय सांगता! मृत्यूच्या 70 वर्षांनंतर देखील आजही अनेकांना जीवनदान देतेय महिला

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More