महाराष्ट्र मुंबई

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहेत. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार”

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फो

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या