भाजपवाले घरात घुसायला निघालेत, त्यांना सोडणार नाही!

उद्धव ठाकरे

औरंगाबाद | भाजपवाले आमच्या घरात घुसायला निघाले आहेत, मात्र आम्ही त्यांना सोडणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ते पैठणच्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो, या सूत्रानूसार आम्ही भाजपला जपले, जोपासले. मात्र आता ते आमच्या घरात घुसायला निघालेत. त्यामुळे स्वतंत्र लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडला. 2022 पर्यंत हे देणार ते देणार सांगितलं, पण अरे 2022 पर्यंत तुम्ही राहणार आहात का? अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली देखील उडवली.