“माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा”
मुंबई | माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना भवन येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याची भावना व्यक्त केली. या पदाधिकाऱ्यांसोबत सुरु असलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
ठाकरे संकटाला घाबरत नाहीत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करु, पुन्हा पक्ष नव्याने उभा करु, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
भाजप दोन कोंबड्यामध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला जेलमध्ये टाकायचं, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. पण आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, सध्या शिवसेनेचा कठीण काळ सुरु आहे. भगव्याचे निष्ठावंत शिलेदार एक एक करुन तुमची साथ सोडत आहेत. पण या संकटाच्या काळात उत्तर भारतीय महासंघाचे आम्ही पदाधिकारी तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याची माहिती समोर आलीये.
थोडक्यात बातम्या-
“बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं”
“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!
“…तरी देखील आदित्य ठाकरेंना मला साहेब बोलावं लागतं”, अन् रामदास कदमांना रडू कोसळलं!
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर
Comments are closed.