बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संपूर्ण सरकारी यंत्रणा जीवाची पर्वा न करता कोरोनाशी मुकाबला करतीय याचं मला समाधान आहे”

मुंबई| कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत.  कोरोनाच्या फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसत आहे. मात्र, आपली संपूर्ण सरकारी यंत्रणा जीवाची पर्वा न करता कोरोनाशी मुकाबला करत आहे याचं मला समाधान वाटतं असं उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

सर्वांनी एकजूटीनं या संकटाचा सामना करायला हवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. लोकल, बस या सगळ्यांची गर्दी कमी करा, दिलेल्या सुचनांचं पालन करा, लक्षण लपवू नका, घराच्या बाहेर पडू नका, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मी स्वत: पंतप्रधानांशी बोललेलो आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या मिळाव्यात अशी पंतप्रधानांना विनंती केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज लागेल ती देण्याचं वचन पंतप्रधानांनी दिलं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे ‘वॉर अगेन्स व्हायरस’ आहे. आपण खबरदारी घेत आहात, पण आणखी खबरदारी घ्यायली हवी, असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

सॅल्युट… आईची रुग्णालयात मृत्यूशी झुंज; आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!

महत्वाच्या बातम्या-

शिवरायांचा महाराष्ट्र किती लढवय्या आहे हे आपण साऱ्या जगाला दाखवून देऊ- मुख्यमंत्री

बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

चिकन, मटन खाल्याने कोरोना होत नाही- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More