Loading...

मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

जालना | मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा आणि मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं रहा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी जालना येथील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Loading...

वल्लभभाई पटेलांच्या कणखर बाण्यामुळे त्यांना पोलादी पुरूष म्हणतात. मोदींनीही तसाच कणखर बाणा दाखवावा आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं रहावं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे आशीर्वाद घेऊन नरेंद्र मोदीजी पंतप्रधानपदावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत केली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतच ‘गब्बर’; ३६ धावांनी मिळवला विजय

-आयच्या गावात, काय शॉट मारला!!!; कोहली पाहतच राहिला

Loading...

-…अन् धोनीने ग्लोव्ह्जचा वाद शांततेत निकाली काढला

-विधानसभेला शिवसेनेची मतं राज ठाकरेंकडे वळतील- प्रकाश आंबेडकर

Loading...