महाराष्ट्र सोलापूर

वाजंत्र्याच्या पोराने केली UPSC ची परीक्षा क्रॅक!!

सोलापूर | सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 8-10 हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जीवन मोहन दगडे हा युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. जीवनचे वडील मोहन दगडे हे वैराग येथील बँड पथकात काम करतात.

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या ‘इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस’ परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश मिळावले आहे.

वैरागच्या अमर बँड पथकात कलाट हे वाद्य वाजणाऱ्याच्या पोरानं मिळवलेल्या या यशानंतर जीवन आणि दगडे कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. 

दरम्यान, आमचा मुलगा मोठा साहेब झाला आहे, अशी केविलवाणी प्रतिक्रिया जीवनच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या 25 वर्षांपासून मी वाजवत असलेल्या बँडचं आज कुठंतरी सार्थक झालं आहे. आमच्या पोरानं आमच्या कष्टाचं चीझ केलं, असंही त्यांनी त्यावेळी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी ‘या’ तिघांपैकी एकाला मिळू शकते संधी

-बीडनंतर आता बारामतीत राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि उपस्थिती मुख्यमंत्री फडणवीसांची!!

-“या तारखेला मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करतील”

‘हे’ तीन नवे किंगमेकर ठरवणार देशाचा नवा पंतप्रधान!

बास झालं आता, धोनीबद्दल काही बोलाल तर खबरदार- रवी शास्त्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या