बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक; मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 1972 नागरिक आले असल्याची माहिती दिली असून त्यांच्या क्वारंटाईनची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले

जे राज्य त्यांच्या नागरिकास घेण्यास तयार नाही त्यांना मुंबईत संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय,विदेश मंत्रालय,गृह मंत्रालयाच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थांत्मक क्वारंटाईनची सुविधा करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

कोरोनासोबत जगायला शिका, यावर सध्या काहीही औषध नाही- राजेश टोपे

ठाकरे सरकार मजुरांच्या मदतीला; रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला काम

‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More