Top News तंत्रज्ञान देश

आता बक्कळ पैसे वाचणार; पेट्रोलशिवाय चालणाऱ्या ‘या’ गाड्या लवकरच बाजारात!

नवी दिल्ली | कोरोना महामारीचे जगावर मोठे संकट आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. भारतालाही याचा फटका बसला असुन पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत आहे. देशात पेट्रोलच्या किंमतीने प्रति लिटर शंभरचा आकडा पार केलाय. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागत आहे.

भारतात इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च झाल्यापासून ग्राहक त्याकडे आकर्षित होतायेत. या स्कूटर्सचा दर कमी असून त्याला लागणारा खर्चही कमी आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. काही तासांच्या चार्जिंगवर ह्या गाड्या मोठ्या लांबीचा पल्ला गाठत आहेत. अश्या इलेक्ट्रिक स्कूटर्स बद्दल आपण जाणून घेणार आहोत-

Okinawa Cruiser:-  ही स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनूसार ह्या गाडीत 3KWची ब्रशलेस मोटर आहे. पॉवर देण्यासाठी 4KW लिथीयम आयन बॅटरीच्या वापर केला आहे. ही स्कूटर एका तासाला 100 कि.मी प्रती वेगाने धावू शकते. 2 ते 3 तासात संपूर्ण बॅटरी चार्ज होते.

Hero Electric Scooter AE-29:- हिरोनेही इलेक्ट्रिक स्कूटर्सची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. कंपनीने यात 1000w ची मोटर दिलीये. गाडीला पॉवर देण्यासाठी लाईट वेट पोर्टेबल लिथीयम आयन 48/3.5 kWh बॅटरी आहे. या गाडीत 55 कि.मी वेगाने धावण्याची क्षमता असून पूर्ण बॅटरी चार्जिंग करायला 4 तास  वेळ लागेल. स्कूटरची सुरुवातीची किंमत 85,000 रुपये असू शकते.

Ola Electric Scooter:- भारतात टॅक्सी सेवा पुरवणारी कंपनी ओला लवकरच भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. या गाडीबद्दाल ओला लवकरच अधिकृत माहिती जाहिर करणार आहे. हि स्कूटर 240 कि.मी चे अंतर पार करु शकते. काही दिवसांपूर्वी या गाडीचे काही फोटो देखील समोर आले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर्सला बाजारात मिळणारा प्रतिसाद पाहता ओला लवकरच भारतीय बाजारात दाखल होईल, अशी शक्यता आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.50 लाख असेल असा अंदाज आहे.

Vespa Electric Scooter:-  भारतात प्रसिद्ध असलेली वेस्पा स्कूटर नवीन अवतारात या वर्षी फेब्रुवारीत लॉन्च होणार आहे. पियाजियो इंडिया बऱ्याच वेळेपासून यावर काम करत आहे. वेस्पा इलेक्ट्रिक भारतात नवीन असली तरी युरोपियन बाजारात इलेक्ट्रिक वेस्पा आधीपासून आहे.

इलेक्ट्रिक वेस्पामध्ये 4kw ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. ही मोटर 200nm पेक्षा अधिक टॉर्क देते. इलेक्ट्रिक वेस्पा सिंगल चार्जवर 100 कि.मी पेक्षा अंतर पार करु शकते. वेस्पा मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. माहितीनूसार कंपनी वेस्पात 4.3 इंचचे डिजिटल इंस्ट्रूमेंट पैनल आणि ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिविटी वापरणार आहे. या गाडीची सुरुवातीची अंदाजे किंमत 90,000 रुपये असेल.

दरम्यान, इलेक्ट्रीक गाड्यांच्या मार्केटला भारतात आता कुठे सुरुवात झाली आहे. टाटा, ह्युंदाई सारख्या मोठ्या कंपन्यांनी कारच्या इलेक्ट्रीक मार्केटमध्ये आघाडी घेतली आहे. इलेक्ट्रीक दुचाकींनाही ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आगामी काळात या बाजारपेठेची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे.

ताज्या बातम्या

अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार

जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव; अरुण गवळीच्या कोरोना टेस्टचा निकालही आला!

…तर कोल्हापुरी हिसका दाखवू, ‘या’ भाजप नेत्याला स्वाभिमानीचा इशारा

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या