बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गच्चीत उभा असताना त्याचा तोल गेला, अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. यामध्ये काही लोक एका इमारतीच्या गच्चीमध्ये थांबलेले आहेत. एका कार्यालयाबाहेर ते वाट पाहात असल्याचं व्हिडीओवरुन लक्षात येत आहे. गच्चीमध्ये तीन ते चार जण उभे आहेत. काही वेळातच तिथे उभा असणाऱ्या एका व्यक्तीचा डोळा लागतो आणि तोल जातो.

हा व्यक्ती इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन खाली कोसळतो . मात्र, तितक्यात आजूबाजूला असणारे लोक प्रसंगावधान राखत ताबडतोब त्या व्यक्तीचे पाय पकडतात आणि त्याला पडण्यापासून वाचवतात.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना केरळच्या कोझीकोडमधील वडाकारामधील आहे.

दरम्यान, देव तारी त्याला कोण मारी हे वाक्य अनेकदा आपण ऐकलं. अनेकदा असे प्रसंग आपल्यासमोर घडतात ज्यातून समोरची व्यक्ती बचावेल असं वाटत नाही मात्र तरीही ती व्यक्ती यातून सुखरुपणे बाहेर येते.

 

थोडक्यात बातम्या- 

झोमॅटो वाद प्रकरणात आला मोठा ट्विस्ट; डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणारी महिला फरार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

“शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More