नांदेड महाराष्ट्र

‘हा’ नेता सत्तेत असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही- विनायक मेटे

नांदेड | मराठा आरक्षणासंदर्भात नांदेड येथे एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात. तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन चर्चा करावी, असं विनायक मेटे यांनी सांगितलं.

राज्य सरकारने येत्या दीड महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. सरकारने हे करुन दाखवलं तर आम्ही सरकारचा सत्कार करु. मात्र सरकारला ही गोष्ट जमली नाही तर मराठा समाज काय करेल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कायदा हातात घेणार नाही, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणासाठी काहीच करता येत नाही म्हणून एल्गार करावा लागतोय. आम्ही अशोक चव्हाण यांना भेटलो, पत्र लिहलं, पण काहीच झालं नाही. त्यांच्या मनात खोटं आहे. तुमच्यासारखा नतद्रष्ट नेता खुर्चीवर असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी घणाघाती टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

मराठा समाजाने ठरवलं तर तुमच्या घराला घेराव घालायला वेळ लागणार नाही. सरकार ने तयार केलेला गायकवाड आयोग खरा आहे का बोगस? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा, त्यानंतर संख्याबळानुसार प्रत्येक समाजाला आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष रसत्यावर उतरेल, असा इशारा विनायक मेटे यांनी सरकारला दिला.

थोडक्यात बातम्या-

महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

शिवसेनेने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी; ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल वाद विकोपाला जाणार?;

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच- शरद पवार

पुणे-नगर-औरंगाबाद रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या