विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

पर्थ | आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवण्यात आलं. त्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

विराट हा कांगारुंची धुलाई करत असताना त्याला मध्येच पंचांनी झेलबाद ठरवलं वलं. पीटर हँड्सकाॅबने घेतलेला हा झेल जमिनीवर टेकल्याचं दिसत असतानाही विराटला बाद दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांचा पंचावर तीव्र संताप झाला आहे.

लिटल मास्टर सुनिल गावस्कर आणि आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही या पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, विराट कोहली जेव्हा बाद झाला तेव्हा तो 123 धावांवर खेळत होता. तेव्हा भारताची धावसंख्या 251 होती. शिवाय भारत 75 धावांनी पिछाडीवर होता. 

महत्वाच्या बातम्या –

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती

-…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

Google+ Linkedin