बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आपण कोरोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे-नितीन गडकरी

नवी दिल्ली | आपण कोरोनासोबत जगण्याचं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिकलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने पाळाव्यात असंही त्यांनी म्हटलं आहे.

बाहेर वावरताना मास्क लावलाच पाहिजे. एक मीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. तसंच सॅनेटायझरचा वापर हा ऑफिसमध्ये किंवा घरात प्रवेश करण्याआधी आणि बाहेर पडताना केला पाहिजे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मॉल्स, सलोन्स, ब्युटी पार्लर्स कधी सुरु होतील हा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हे लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे, असं गडकरींनी म्हटलं आहे.

दरम्यान, मॉल्स, सलोन्स, ब्युटी पार्लर्स या संदर्भात राज्य सरकार जे निर्देश आणि नियम आखून देईल त्याचं पालन करणंही महत्त्वाचं आहे असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

स्थलांतरित मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

सांगलीच्या आजीबाईंचा पॅटर्नच वेगळा; वयाच्या 94 व्या वर्षी केली कोरोनावर मात!

महत्वाच्या बातम्या-

देशभरातील देवस्थानांकडे असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्या; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला सल्ला

संभाजी राजेंनी सूत्र फिरवली; गड-किल्ले जिवंत ठेवणाऱ्यांना मदत मिळाली

स्थलांतरित मजुरांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More