स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीचं काय झालं?

मुंबई | तत्वतः सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर सुकाणू समितीने आंदोलन मागे घेतलं आहे. मात्र स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीचं काय झालं?, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. 

सुकाणू समिती आणि  उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत या निर्णयावर ठोस काही निर्णय झाला नाही. मात्र या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या