बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | राज्य सरकारने लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये 25 जिल्ह्यामध्ये कमी झालेल्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर माेठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईची लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे मात्र कोरोनाच्या सक्रीय रूग्णांची संख्या कमी झालेली नाही त्यामुळे मुंबईमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत. मात्र अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुंबईकरांना दिलासा देणारं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते खार एच. पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यलयाच्या उद्घाटनावेळी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काही ठिकाणी निर्बंधामध्ये शिथिलता देण्याची गरज होती. तिथे आम्ही दिली आहे. परंतु ज्या ठिकाणी शिथिलता अद्याप देण्यात आली नाही, त्यांनी अस समजू नका की, ते आमचे लाडके आहेत आणि तुम्ही आमचे दुश्मन. नागरिकांनो आणि व्यापाऱ्यांनो तुम्ही अजून धीर सोडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. यावेळी मुंबई लोकलवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

दरम्यान, मुंबई लोकलची प्रतिक्षा मुंबईकर खुप दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मुंबईच्या नागरिकांना थाेडा दिलासा मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यात राष्ट्रीय खेळाडु वैष्णवी ठुबेला मारहाण; रुपाली पाटील म्हणाल्या,कार चालकास अटक करा अन्यथा…

राज्यपालांच्या प्रामाणिक कामामुळे काहींना मळमळ- देवेंद्र फडणवीस

मुंबई लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलं ‘हे’ वक्तव्य

आभाळाएवढी कामगिरी पण कर्णधाराचे पाय जमिनीवर; कांस्य पदक कोव्हिड योद्ध्यांना समर्पित

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा – अमृता फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More