बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कॅालेजला जाता येता झाली ओळख, मुलगी गर्भवती झाल्यावर बलात्कार झाल्याचं उघड

पुणे | पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ 17 वर्षांची असलेली तरुणी गर्भवती असल्याचं समोर आलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोहगाव येथील एका महाविद्दालयात संबंधित तरुणी शिक्षण घेत होती. रोज महाविद्दालयात जाताना एका तरुणाने तिची ओळख काढली. या ओळखीचं रुपांतर काही वेळानंतर चांगल्या मैत्रीत झालं. संबंधित तरुणीला विश्वासात घेत आपलं घर दाखवण्याचं कारण सांगून तरुणाने तिला लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगरावर नेलं. तिथं नेल्यानंतर लग्नाचे खोटं आमिष दाखवून तरूणाने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरिक संबंध ठेवले.

हा प्रकार ताजा असतानाच संबंधित तरुणीला आठ दिवसानंतर आरोपी तरुणाने पुन्हा एकदा त्याच ठिकाणी नेलं. तिथं नेल्यानंतर त्याने परत एकदा शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलं.

दरम्यान, संपुर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरोधात तक्रार नोंदवली आहे. मात्र संबंधित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

थोडक्यात बातम्या-

दुसरं लग्न करणार का?, आशुतोष सोडून गेल्यानंतर मयुरी पहिल्यांदाच या विषयावर बोलली

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातल्या प्रत्येकाला मिळणार मोफत लस

प्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप

तलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली!

पुण्यात महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More