Top News महाराष्ट्र सांगली

“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”

Photo Courtesy- Facebook/SadabhauKhot1

सांगली | रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत आपल्या मिश्कील भाषणांसाठी ओळखले जातात. बेधडकपणे बोलण्याचा त्यांचा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, मात्र अशाप्रकारे बोलताना ते वादही निर्माण करत असतात. आताही त्यांनी मंत्रिपदाबाबत असंच वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे मोठा वाद होऊ शकतो, तसेच सदाभाऊ खोत यांना देखील टीकेचा सामना करावा लागू शकतो.

मंत्री होण्यासाठी फार काही अक्कल लागत नाही. मंत्री झाल्यावर हे मला कळलं. रात्रंदिवस झोपून राहिलं तरी चालतं. मी मंत्री होईन, असं कुणाला तरी वाटलं होतं का?, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राजकारणात लोक जेवढं मिळेल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतात. अडीच वर्षासाठी मिळालेल्या पदाचं काही खरं नसतं. लोक तुम्हाला आश्वासन देतात की तुम्हाला आमदार करतो, पण राजकारणात तुम्ही झोपून राहिलात तर लोक तुमचा गळा दाबून जातात, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वाक्याचा रोख नेमका कुणाच्या दिशेनं आहे, याच्या चर्चा मात्र आता सुरु झाल्या आहेत.

या कार्यक्रमाला कवठेपिरान येथील भीमराव माने उपस्थित होते, त्यांच्या पत्नीला सरपंचपद मिळाल्याचा धागा पकडत आता माझी पत्नी या कार्यक्रमाला उपस्थित असती तर मला म्हणाली असती तुम्ही आमदार झालात, आता मला खासदार करा. त्यांच्या या वक्तव्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.

थोडक्यात बातम्या-

गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!

साताऱ्यातील पोरींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचं खरं कारण आलं समोर, पाहा व्हिडीओ

आंदोलनजीवी! शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मिटअपचं आयोजन

“…लायकी नसताना शरद पवारांसारख्या नेत्यावर आरोप करू नये”

द्धव ठाकरे शरद पवारांच्या निरोपाची वाट पाहतायेत का?- किरीट सोमय्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या