पुणे | सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी बी सावंत यांचं पुण्यातील बाणेर येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपले एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात वकिली करायला सुरुवात केली होती. 1973 साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती.
अत्यंत हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचे सावंत यांनी कायम आपल्या कामातून छाप पाडली. कडक शिस्तीचे आणि नियमांचे काटेकोर पालन करणारे सावंत ह्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या खटल्यांचे निकाल दिले, तसेच 1982 ला झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी त्यांची दिल्लीला सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
2002 ला झालेल्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापित केलेल्या न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय पीपल्स ट्रीब्यूनलमध्येही त्यांनी काम केले आहे. 1995 साली सावंत सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली. सावंत आपल्या हजरजबाबी आणि मनमिळावू व्यक्तिमत्वामुळे नेहमीच सर्वांच्या जवळचे होते.
सर्वसामान्यांच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. ते कायद्याचे अभ्यासक होते. गेल्या महिनाभरापासून ते आजारी असल्यामुळे अंथरूणाला खिळून होते. अखेर सोमवारी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
थोडक्यात बातम्या-
मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
युवराज सिंगला मोठा धक्का, या प्रकरणात अखेर FIR दाखल
निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन
जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात येताच सर्वात मोठी घोषणा
येतेय मराठ्यांची आणखी एक शौर्यगाथा… सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत