बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्नीने केली आत्महत्या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास

अहमदनगर | अनेक ठिकाणी लोक म्हणतात की प्रेमात काही तरी मोठं केलं. मात्र जोडीदाराचा जीव गेल्यावर आपला देखील जीव संपवल्याचा मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित घटना ही अहमदनगरमधील आहे.

अहमदनगरमधील जामखेड येथे एका जोडप्याने आत्महत्या केल्यामुळे संपुर्ण परिरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित जोडप्यातील पत्नीचं नाव शिल्पा जाधव तर पतीचं नाव अजय जाधव असं आहे. या दोघांचं लग्न 4 महिन्यांपुर्वीच झालं होतं. मात्र, त्यांच्या हसत्या खेळत्या संसाराला जणू कोणाची तरी नजरच लागली.

बुधवारी शिल्पा हिने बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी असलेल्या आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती शिल्पा हिच्या पतीला मिळताच अजयने देखील त्याच्या ऑफिसमध्येच गळफास घेतला. शहरातील मोरेवस्ती येथील पाण्याच्या प्लांटमध्ये त्याचं ऑफिस आहे.

दरम्यान, दोघा नवरा-बायकोने टोकाचं पाऊल का उचललं या बाबतची कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली आहे. मात्र आत्महत्येपुर्वी अजयने एक चिठ्ठी लिहली आहे. ज्यामध्ये आपल्या आत्महत्येला सर्वस्व आपण जबाबदार असून कोणालाही दोषी ठरवू नये, असं लिहण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा”; यूट्यूबची मोठी घोषणा

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका, “केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More