विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरुन गावकऱ्यांची महिलेला विक्षिप्त शिक्षा!

भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी महिलेला विक्षिप्त शिक्षा दिली आहे.

झांबुआ जिल्ह्यातील हा प्रकार असून या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये महिलेने पतीला खांद्यावर उचलून घेतल्याचं दिसत आहे.

पतीला खांद्यावर घेवून या महिलेला गावभर फिरण्याची शिक्षा दिली गेली. तसेच गावकऱ्यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचंही व्हीडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून व्हीडिओमध्ये दिसणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-नरेंद्र मोदींशिवाय चांगला पंतप्रधान पाकिस्तानला मिळू शकत नाही- अरविंद केजरीवाल

-आशिष शेलार-सचिन सावंतांमध्ये जुंपली! ट्वीटरच्या माध्यमातून रंगलं शाब्दिक युद्ध

देशाचे तुकडे होऊ देणार नाही- नरेंद्र मोदी

-‘काँग्रेस गाढवांचा पक्ष’; सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची काँग्रेसवर सडकून टीका

-आघाडीकडून भुुजबळांनी सांगितली पंतप्रधानपदासाठी ‘ही’ पाच नाव