बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे जगातील सर्वांत मोठी आर्थिक मंदी; आयएफएमचं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं भाकित

मुंबई | कोरोनामुळे जगातील सर्वांत मोठी आर्थिक मंदी आली असल्याचं धक्कादायक विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालिकेने केलं आहे. या घडीची जगातील  अर्थव्यवस्था 2009 मध्ये आलेल्या मंदीपेक्षा वाईट स्थितीत आहे, असं आयएमएफने म्हटलं आहे.

अगोदरच कोरोनानेमुळे हजारो जणांचे रोजगार गेले आहेत. कोरोनाच्या भीतीने त्यांनी स्थलांतर केले आहे. त्यामुळे त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. अशातच आयएफएमच्या जागतिक अर्थव्यवस्थेवरच्या भाकिताने आता मोठी चिंता वाढू शकते.

कोरोनाने जगभरात हातपाय पसरले आहेत. चीन, अमेरिका, स्पेन, ब्रिटन, इटली या सगळ्या देशांत कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत. तर दरदिवशी रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशा स्थितीत बरेचसे देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे अमेरिकेबरोबरच जगभरातील तरूणांचे रोजगार जाण्याची भिती व्यक्त होतीये.

दरम्यान, 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था सावरण्याची आशा करूया, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालिका क्रिस्टिलिना जॉर्जियेवाने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह

तब्लिगीमुळे 14 राज्य व्हेंटिलेटरवर; तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

महत्वाच्या बातम्या-

“दिवे पेटवताना ही काळजी घ्या, नाहीतर तुमचा हात पेटू शकतो”

कोरोनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न नका- जे. पी. नड्डा

या तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; तिकीट बुकिंग करण्यास एअर इंडियाचा नकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More