मुंबई | राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं समोर येत आहे, राज्य सरकारने यामुळेच शिवजयंतीसारख्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या सणावरही निर्बंध आणले होते, मात्र असं असलं तरी राज्यात राजकीय कार्यक्रमांना मात्र कुठलेही निर्बंध नसून ते धडाक्यात सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात मटणप्रेमींसाठी वशाटोत्सवाचं आयोजन केलं आहे, हा कार्यक्रम आता वादात सापडला असून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासोबत आता लेखिका शेफाली वैद्य यांनीही यासंदर्भात टीका केली आहे.
ठाकरे सरकारच्या राज्यात 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या कार्यक्रमावर निर्बंध लादले आहेत, मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीला आयोजित मटणपार्टीला परवानगी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात अशाप्रकारे राज्य कारभार सुरु आहे, असं शेफाली वैदय यांनी म्हटलं आहे.
तृप्ती देसाई यांनीही या मटण पार्टीवरुन राष्ट्रवादीला जोरदार लक्ष्य केलं आहे. या उत्सवाला परवानगी कुणी दिली? या उत्सवामध्ये सुद्धा 100 जणांनी सहभागी व्हायचे, असे निर्बंध का नाही लादले? जसं दिल्लीत तबलिगी प्रकरण गाजले होते त्याची पुनरावृत्ती या गर्दीतून झाली तर मग कोण जबाबदार?, असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.
दरम्यान, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पुण्यातील चांदणी चौक भागात वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून इथं संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येनं मटणप्रेमी गर्दी करणार आहेत. या कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार राज्यभर झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यामुळेच उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी!
एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!
….म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्स संघात घेतलं- माहेला जयवर्धने
पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!
सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!