पुणे | कोरोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केलं आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना आणि सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवले अमृततुल्य यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, गणेश येवले, निलेश येवले, मंगेश येवले, तेजस येवले तसेच संजय येवले निलेश मोरे उपस्थित होते.
येवले अमृततुल्य संचलित येवले फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आस्करवाडी आणि भिवरी या ठिकाणी 2000 मास्क व सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आलं.
संपुर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरण्यासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीत लढणाऱ्या या सर्व मंडळींना मोफत चहा देण्याचं काम सुरू आहे.
मनानं आणि शरीरानं थकलेल्या या जीवांना तेवढीच तरतरी यावी आणि त्यांच्या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, एवढंच यामागचा उद्देश असल्याचं येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक
परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती
महत्वाच्या बातम्या-
“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”
धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला; मुंबईसाठी धोक्याचा इशारा
वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं!
Comments are closed.