बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीने टाकलेली ती एक गुगली होती, आता शिवसेनेचं हिंदुत्व फिकं पडतंय”

नवी दिल्ली |  एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर जोरदार टीका केली आहे. त्यातच भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात. मात्र, एमआयएम पक्ष चालत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्यासाठी दोनवेळा काँग्रेसनेच उमेदवार उभा केला होता. पंडित नेहरू प्रचाराला आले होते. बाबासाहेबांचा पराभव केला, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

आमचा एक नंबरचा शत्रु काँग्रेस आहे. दोन नंबरचा शत्रु एमआयएम आहे आणि तिसरा शत्रु कम्युनिस्ट आहे. त्यामुळे एमआयएम ही भाजपची बी काय झेड टीमही असू शकत नाही. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेली ही गुगली आहे. राष्ट्रवादी गेला बाजूला, काँग्रेस गेला बाजूला, शिवसेनाच एमआयएमशी युती करतयं की काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी बोलताना शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे. भाजपला शह देण्याची क्षमता शिवसेनेत राहिलेली नाही. घसरता जनाधार सांभाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची हिंमत वाढवण्यासाठी आम्ही भाजपला सुरूंग लावण्यासाठी जात आहोत, असं ते सांगत आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व आता फिक पडत आहे, असा बोचरी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य मोदींना देखील मान्य नसेल, 1993च्या दंगलीत…”

महागाईचा पुन्हा भडका उडाला! मार्च महिन्यात दूध, मॅगीसह ‘या’ गोष्टी महागल्या

“… आणि तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांचा थयथयाट असाच सुरू राहिल”

मोठी बातमी! हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचा छापा

“ज्यांचा आदर्श दाऊद आहे त्या मटण करींना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More