बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! विमानतळावर जिन्सला पिवळा रंग लावून, तपासणी केल्यानंतर दिसलं ते पाहून पोलिसही झाले हैराण!

नवी दिल्ली |  सोन्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांचा वापर करताना दिसत आहेत. सोन्याची तस्करी करताना अनेक जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र विमानतळावरील सोन्याची तस्करी अजूनही चालू असल्याचं दिसत आहे. अशातच केरळच्या कन्नुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने चक्क आपल्या जीन्स पॅंन्टमधून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याला ताब्यात घ्यायला यश आलं आहे.

कन्नुर विमानतळावर पिवळ्या रंगाची जीन्स पॅंन्ट घातलेल्या एका तरूणावर अधिकाऱ्यांना संशय आला. पोलिसांनी त्या तरूणाची तपासणी केली. त्यानंतर तरूणाने दोन थर असलेली पॅंन्ट घातलेली होती. दोन थरांमध्ये एका बाजूला पिवळ्या रंगाची पेस्ट होती. त्यामुळे ती पेस्ट मेटल डिटेक्टरमध्ये डिक्टेट होत नव्हती आणि पँटच्या तपासणीनंतर त्यामध्ये अधिकाऱ्यांना सोनं आढळून आलं.

जीन्स पॅँन्टच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. तेव्हा कन्नुर विमानतळावरील सीमा शुल्क विभागातील एअर इंटेलिजन्स युनिटनने त्या तरूणाकडून 302 ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास लाखांच्या घरात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. मात्र परदेशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करी रोखण्यासाठी पोलिसांची चांगलीच कंबर कसावी लागत आहे.

थोडक्यात बातम्या-

भारताला धक्का! पॅरालिम्पिकमधील विनोद कुमारांचं कांस्यपदक काढून घेतलं

आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन घेऊन जाणं होणार सोपं, पाहा व्हिडीओ

धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या ‘या’ खेळाडूने घेतला तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय !

शिवसेनेच्या पाठीमागं ईडीचं शुक्लकाष्ठ! अनिल परबांनंतर ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची छापेमारी

ह्रदयद्रावक! शेतकऱ्यावर आली उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More