बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कीव | रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) सैन्य कारवाईचे आदेश देऊन 32 दिवस उलटले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा आज 33वा दिवस असला तरी दिवसेंदिवस रशियाकडून हल्ले अधिक तीव्र केले जात आहेत. रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

युक्रेन सैनिकांसह शेकडो युक्रेनी नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेन रशियाच्या सुरक्षेची हमी देण्यास तयार आहे. आम्ही तटस्थ राहून स्वत:ला अण्वस्त्रमुक्त राज्य घोषित करू, असं वक्तव्य झेलेन्स्की यांनी केलं आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अवास्तव मागण्यांपुढे झुकणार नसल्याचं झेलेन्स्की यांनी स्पष्ट सांगितलं आहे. जर रशियाने निशस्त्रीकरण आणि निशस्त्रीकरणाची चर्चा केली तर आम्ही वाटाघाटीच्या टेबलावरही बसणार नाही, असं झेलेन्स्की रशियासोबतच्या चर्चेपूर्वी म्हणाले आहेत.

दरम्यान, दोन देशांमधील युद्ध (Russia-Ukraine War) संपवण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. 28 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 7 मार्च रोजी रशिया व युक्रेनमध्ये शांतता चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून युद्ध संपवण्यासाठी अद्यापही मार्ग सापडलेला नाही.

थोडक्यात बातम्या-

“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”

कार चालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम लवकरच लागू होणार

“भाजप सत्तेत असतानाच काश्मिरी पंडित बाहेर गेले”

IPL 2022! मिस्ट्री गर्लनं उडवलीय सर्वांची झोप, पाहा कोण आहे ‘ही’ तरुणी

Health ! काॅफी सेवनाचे आहेत ‘हे’ महत्त्वाचे फायदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More