हैदराबाद | संपूर्ण देशात काँग्रेसची वाताहत चालू आहे. लोकसभा निवडणुकीत आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं. यामुळेच काँग्रेसच्या 18 पैकी तब्बल 12 आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी विधानसभा सभापतींची भेट घेऊन मागणी केली आहे.
काँग्रेसच्या 12 आमदारांनी तेलंगणा विधानसभा अध्यक्ष पोचाराम श्रीनिवास यांची भेट घेऊन ‘टीआरएस’मध्ये विलीनीकरणाची मागणी केली.
एकीकडे काँग्रेस आमदार विलिनीकरणाची मागणी करत असताना दुसरीकडे काँग्रेस खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी मात्र विलिनीकरणाला विरोध केलाय.
दरम्यान, सत्तेत असलेल्या टीआरएस पक्षामध्ये काँग्रेस आमदार सहभागी होण्यापाठीमागे आर्थिक लाभाचे कारण आहे, असं काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-…म्हणून राष्ट्रवादीच्या महिलांनी राम कदमांना दिला साडीचोळी आणि बांगड्यांचा आहेर!
-विखेंचा भाजपप्रवेश मुख्यमंत्र्यांनी ठेवला वेटिंगवरच; म्हणतात…
-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, भारतातील हवा आणि पाणी चांगलं नाही…
-RSS च्या लोकांसारखी चिकाटी हवी; त्यांच्याकडून काहीतरी शिका- शरद पवार
-“भाजपजवळ 303 तर शिवसेनेजवळ 18 खासदार; राम मंदिर करायला आणखी काय पाहिजे”
Comments are closed.