बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीसांनी ओबीसी आणि मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”

मुंबई | तौक्ते वादाळामुळे झालेल्या नुकसानीबाबत पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली होती. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार वेळखाऊपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, अशी भाजपची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युतर दिलं आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजासाठी आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिलं पाहिजे, ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ यापद्धतीनं बोलता येतं. त्यांनी कधी ओबीसी समाजाला, तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं, अशा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर राज्य सरकारला अधिकारच नाही, असा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर फेरविचार याचिका केंद्राने दाखल केली होती. देवेंद्र फडणवीस कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण दिल्याचं सांगत आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकारच नाही सांगितले आहे त्याचे काय?, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आता आमची भूमिका आहे तीच भाजपची देखील भूमिका आहे. याच्यावर एकमत असताना परत भाष्य करण्याची गरज नाही. समाजासमाजात भेद निर्माण करण्यासाठी ते बोलत आहेत का?, अशा प्रश्न देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या-

मास्क न घालता फिरणाऱ्या तरूणाचा मुजोरपणा; गाडी न थांबवता पोलिसाला रस्त्यावर फरफटत नेलं

‘…म्हणून मी वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड’; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने केला मोठा गौप्यस्फोट

…म्हणून एक दोन नाही तर तब्बल 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीच्या दिशेने रवाना, कारण ऐकून बसेल धक्का

संतापजनक! प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवण्यात अडथळा आणला म्हणून मुलीने आईसोबत केलं ‘हे’ भयानक कृत्य

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More