मुंबई | राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णयास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब,मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती!
“चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडून आणलं, आता कोल्हापुरातूनही आणतो”
राज्यातील नोकर भरतीबाबत नितीन राऊत यांची मोठी घोषणा!
“विधान परिषदेत सावरकरांचा फोटो लावणं हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान”
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…