रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
रायगड | सोशल मिडीयावर सतत काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक वेळा या व्हिडीओंमध्ये काही अपघाताच्या व्हिडीओंचा देखील समावेश होतो. अशात कर्जत-नेरळ रोडवर झालेल्या भिषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
कर्जत-नेरळ रोडवर एक रिक्षा यू-टर्न घेत असताना मागून एक कार वेगाने येत होती. त्या कारच्या वेगामुळे कारची आणि रिक्षाची जोरात धडक झाली. यादरम्यान रिक्षा मधील सीएनजी गॅसचा टँक फुटला आणि या आपघातात रिक्षातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील लोक पळत बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अपघातात असलेली संबंधीत कार हूंडाईची असून रिक्षात 2 महिला, 1 लहान मुलगा आणि 1 पुरुष, असे चार जण ठार झाले आहेत. रिक्षा चालकाने हाॅस्पिटलच्या समोर अचानक यू-टर्न घेतल्यामुळे वेगाने येणाऱ्या गाडीची धडक बसली. मात्र वेळीच मदत मिळाली असती तर रिक्षातल्या लोकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रीया आता समोर आली आहे.
दरम्यान, या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. तसेच रिक्षा ही कल्याण येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
On Karjat_Neral road CNG tanker explodes in car collision, 4 people got killed on the spot, CCTV footage went viral!#news #accidents #VideoViral pic.twitter.com/2X0xCGLaRs
— Akanksha Patil (@Akanksh85463872) March 30, 2021
थोडक्यात बातम्या-
31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्वाचं काम अन्यथा तुमचं पॅनकार्ड होऊ शकतं रद्द!
लोकांच्या विरोधानंतरही सरकार लॉकडाऊन लावणार? राजेश टोपे म्हणाले…
भारत नानांच्या पेहरावात भगीरथ दादा, राष्ट्रवादीचा सहानुभूतीचा प्रयत्न!
‘विठुरायाच्या नगरीची दुरवस्था बघवत नाही’; बिचुकलेंनी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी दाखल केला अर्ज
“चित्रपटात दाखवतात ते पोलीस आणि प्रत्यक्षातले पोलीस यांच्यात जमिन आस्मानाचा फरक असतो”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.