देश

17 वर्षीय दिव्यांग मुलीवर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

मधुबनी | चारा घेण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलीसोबत काही जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली

या घटनेनंतर ओळख लपवण्यासाठी लाकडाच्या तुकड्याने मुलीचे डोळे फोडण्यात आले आणि अशाच अवस्थेत तिला फेकून आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. यामुलीला दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या एका डोळ्यात लाकूड घुसवून तिचा डोळा फोडण्यात आला आहे. तर दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी जाण्याचा धोका आहे. याशिवाय डोळ्यांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.

मुलगी शेळ्यांसाठी चारा आणि जळणासाठी लाकडं आणायला जवळच्या मनहरपूर गावाच्या नदीकिनारी गेली होती. त्याचवेळी काही क्रूर लोकांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी खूप उशीर झाला तरी घरी पोहचली नाही म्हणून तिला शोधण्यासाठी कुटुंबातील लोक बाहेर पडले, तेव्हा एका बागेत मुलगी नग्न स्थितीत बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती  कुटुंबियांनी पोलिसांना दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

सत्यता पडताळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल- दत्तात्रय भरणे

…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी

“मुस्लिम चार विवाह करतात, धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?”

ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

गुजरातच्या मंदिरांमध्ये भाविकांना ‘साष्टांग नमस्कार’ घालण्याची परवानगी नाही तर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या