बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतप्रकरणी राज्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला – नवाब मलिक

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटले होते. अशातच आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी प्रवक्ते आणि अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा विरोधकांवर घणाघात केला आहे. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कटकरस्थान रचण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने हातात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. तरिही अद्याप सीबीआयने याबाबतीत कोणताही ठोस खुलासा केला नाही. एखादी घटना घडली तर त्या राज्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला जातो. मात्र, सुशांतसिह प्रकरणात बिहारमध्ये त्यांच्या हद्दीत गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.

तसेच सीबीआय गेली एक वर्ष या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, अद्याप सीबीआयने सुशांतच्या मृत्यूचं कोणतही ठोस कारण सांगितलं नाही. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठीच हे प्रकरण रंगवण्यात आलं होतं, असं देखील मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र, याला विरोध करुन भाजप नेते मोदींचं देखील ऐकू शकत नाहीत, असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या –

…अशाप्रकारे गॅस बुक केल्यास मिळेल 2700 रुपयांचा कॅशबॅक, वाचा धमाकेदार ऑफर!

अश्लील व्हिडीओ प्रकरणात आता शर्लिननं साधला राखी सावंतवर निशाणा, म्हणाली…

रक्त शोधण्यासाठी आई रात्रभर धडपडली, अखेर डाॅक्टरच बनले देवदूत

दिलासादायक! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटतोय; वाचा आजची आकडेवारी

चित्रीकरण सुरु असताना अभिनेत्री नुसरत भरूचाला अॅटॅक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More