बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

नवी दिल्ली | भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चरूनी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यांवर येऊन ठिय्या आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी हिसार-दिल्ली या मार्गावरील बसताडा टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे.

गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना एकत्रित होण्यास सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी संपूर्ण रस्त्या चक्काजाम करत ठिय्या दिला. त्यावेळी भाजपचे काही नेते आंदोलन स्थळी दाखल झालेत. परंतु, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला गेला. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात आंदोलन करणारे शेतकरी सुशील काजल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं सुशील काजल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यानंतर त्यांना मध्यरात्री ह्यदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचं निधन झालं आहे. त्यांनतर या घटनेचा विरोधी पक्षाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तर देशभरात खट्टर सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, पोलीस लाठीहल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.  ते जवळपास 9 महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी असल्याची माहिती गुरनामसिंग यांनी ट्विट द्वारे दिली आहे. विशेष म्हणजे कर्नाल हा मतदारसंघ हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आहे. या घटनेचा काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

रामाशिवाय अयोध्या नाहीच, अयोध्या आहे जिथं राम – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

‘खाकीतील ‘या’ दरोडेखोराच्या मुसक्या आवळणं गरजेचं’; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय?; प्रवेशासाठी ‘ही’ नवी नियमावली जारी

“तुम्ही बिनबापाचे आहात काय?…”; संजय राऊतांची राणेपुत्रांवर जहरी टीका

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचं सावट; वाचा हवामान खात्याचा अंदाज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More