बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर कार्यक्रमात आढळला बंदूकधारी व्यक्ती; योगी आदित्यनाथ यांनी थेट अधिकाऱ्यांवर कारवाई

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षापासून देशाच्या सीमा भागात दहशतवादी कायवाया वाढल्याच्या दिसून येत आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका कार्यक्रमात बंदूकधारी व्यक्ती आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेवरून देशातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा उत्तर प्रदेशमधील बस्ती याठिकाणी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात परवाना असलेला एक व्यक्ती बंदूक घेऊन आला. परंतु कार्यक्रम सुरू होण्याच्या 45 मिनिटांआधी त्या व्यक्तीकडे बंदूक असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी पाहलं. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, अशी माहिती बस्तीचे पोलीस अधिक्षक आशिष श्रीवास्तव यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमावेळी पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून आल्यामुळे 4 पोलिसांवर निंलबनाची कारवाई करण्यात आली आहे. बस्ती जिल्ह्यात तैनात असलेले विंध्याचल, हरी रॉय, शिवधनी, राम प्रकाश या 4 उपनिरिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, त्याचबरोबर सुरक्षेसाठी तैनात असलेले रामशंकर मिश्रा, वरूण यादव आणि अवधेश कुमार या 3 उपनिरीक्षकांसंबंधी अहवाल पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. यापैकी दोन सिद्धार्थनगर आणि कबीरनगरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते, असं आशिष श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिक म्हणतात, “मला राजस्थानमधून धमकीचा फोन येतोय, समीर वानखेडेंना…”

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांनी सोडलं मौन, मांडली जरंडेश्वरची कुंडली

1 नोव्हेंबरपासून व्हॅट्सअॅप होणार बंद, ‘या’ अँड्राॅइड फोनवर व्हाॅट्सअ‌ॅप होणार बंद

काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पंजाबच्या राजकीय मैदानात आता ‘हा’ पक्ष करणार एन्ट्री

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More