बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

अहमदाबाद | गुजरातमधील सुरत येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोनाबाधित महिलेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या चिमुकलीला दूध पाजलं आणि त्यानंतर हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सुरतच्या वराछा येथील डायमंड रुग्णालयात ही घटना घडली आहे.

सुरत शहरात एका महिलेला कोरोनाची लक्षणं असतानाही तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 14 दिवसांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. सदरील महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवत असतानाही तिने जाणीवपूर्वक कोणालाही सांगितलं नाही. तसेच मुलगी जन्मल्यानंतर तिने त्या चिमुकलीला दूध पाजलं व हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली.

सदरील महिलेने मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला दूध पाजलं आणि 2 दिवसातच त्या मुलीची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. तब्येत खराब झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तिला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. जन्माच्या दोन दिवसातच कोरोना झाल्याने तिला डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सुरतच्या वराछा येथील डायमंड रूग्णालयात जन्म झाल्याच्या दोन दिवसानंतरच त्या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतरही त्या चिमुकलीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. त्या मुलीवर प्लाज्मा थेरपीचा वापर करून देखील उपचार करण्यात आले, पण तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर आईची एक छोटी चूक त्या मुलीच्या जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

‘खरंच… हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’; जितेंद्र आव्हाडांची कविता तुफान व्हायरल

‘कोरोना आपला पिछा सोडणार नाही, त्यामुळे…’; पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

सरसंघचालक मोहन भागवत कोरोनामुक्त; एवढे दिवस राहावं लागणार विलगीकरणात

‘अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात…’; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More