बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

नागपूर | कोरोनानं (Corona) जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं तर चिंतेत आणखी भर पाडली आहे.

नागपूरमधील कामठी मार्गावरील एका शाळेत विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं. हे समजताच शाळा आठवड्याभरासाठी बंद करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीनं घेतला. या काळात पहिल्यासारखं ऑनलाईन कामकाज सुरु असणार आहे.

कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिला तर देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हेरिएंटचं नाव ओमिक्राॅन असून यानं देशभरात खळबळ माजवायला सुरुवात केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

कर्जतचं राजकारण तापलं! ‘शरद पवारांचा वारसा असूनही…’, चंद्रकांत पाटलांचा टोला

आनंदाची बातमी! सीरमच्या ‘कोवोवॅक्स’ लसीला WHO ची मान्यता

सरकारचा मोठा निर्णय! MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना मिळणार आणखी एक विशेष संधी

“चंद्रकांत पाटील म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला व्हायरस”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More