Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात पोलिसाच्या मुलीसोबत घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पुणे | सर्वसामान्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्याच घरातील महिलांना सुरक्षेची गरज आहे. कारण पुण्यात एक असाच संतपाजनक प्रकार घडला आहे. पोलिसात शिपाई म्हणून काम करणाऱ्या पोलिसाच्या मुलीचंच अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिचा बलात्कार करण्यात आला आहे.

पुणे वडगाव शेरीमधील 21 डिसेंबरला रात्री 8 च्या सुमारास  पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं. अपहरण करणारा सागर नावाचा 28 वर्षीय तरूण तिचा मित्र होता. सागरने त्याच्या दोन मित्रांसोबत पीडित तरूणीला रस्त्यावर आडवलं.

तिला म्हणाला, माझ तुझ्यावर प्रेम असून मी माझ्याशी लग्न करतो. तु गाडीत बस. जर नाही बसलीस तर मी माझ्या जीवाचं बरवाईट करेल. त्यानंतर ती तरूणी गाडीत बसली. नराधमांनी तिला गुंगीचं औषध देऊन तिचे हातपाय बांधले आणि तिला अहमदनगरमध्ये नेवासा येथे नेऊन तिच्यावर तिच्यावर बलात्कार केला नंतर तिला परत पुण्यात सोडलं.

दरम्यान, पुण्यात आल्यानंतर पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव आणि त्याच्या दोन मित्रांवर चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी’; आशिष शेलारांचा शेट्टींना टोला

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस; 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदे

अंबानी पुत्राचा नामकरण सोहळा; आकाश-श्लोकाच्या मुलाचं ठेवलं ‘हे’ नाव

त्रास होत असल्यास शिवसेना सोडून भाजपमध्ये या; राजन साळवी यांना खुलं निमंत्रण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या