बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वात मोठी बातमी: कोरोनावरील लस घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही!

नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनावरील लसीकरणाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली.

लसीकरण मोहीम राबवत असताना कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. दरम्यान, ही नोंदणी करताना आधार कार्ड देणंही बंधनकारक करण्यात आलं होतं. पण आता युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

काही नागरिकांकडे आधार कार्ड किंवा आयुष्मान कार्ड नसल्यामुळे त्यांना लसीकरणासाठी नोंदणी करणं शक्य होत नाही. त्यामुळे औषधं आणि लस घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुग्णालयात भरती होण्यासाठी तसेच कोरोना लस घेण्यासाठी आणि औषध घेण्यासाठी आता आधार कार्ड बंधनकारक असणार नाही.

युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती करून घ्या, तसेच औषध आणि लसीकरणालाही आधार कार्ड बंधनकारक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आता आधार कार्ड नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आधार कार्ड नसल्यामुळे औषध किंवा लस मिळत नव्हती, त्यांना आता या सुविधा आता मिळणार आहेत.

थोडक्यात बातम्या

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

“मोदीजी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?”; देशव्यापी मोहीम सुरु

अवघ्या 100 रुपयांसाठी दाम्पत्याने मिळून केली युवकाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More