Top News महाराष्ट्र मुंबई

रायगडला ‘निसर्ग’चा मोठा फटका; पालकमंत्री आदिती तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे ही महत्त्वाची मागणी

रायगड | निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. लोकांचं लाखो रूपयांचं नुकसान यामध्ये झालं आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसंच झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

या वादळाचा पंचनामा झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून याची सविस्तर माहिती देईन. तसंच त्यांच्याबरोबर याविषयी सविस्तर चर्चा करून लोकांची नुकसान भरपाई कश्या पद्धतीने देता येईल, हे पाहणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून नुकसानीची माहिती घेतली.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

कोरोना संपल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार- पंकजा मुंडे

महत्वाच्या बातम्या-

हिंदुस्थान युनिलिव्हरकडून सरकारला मोठी मदत; उद्धव म्हणाले, तुमची मदत कधीच विसरणार नाही!

माणुसकी मेली, गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर फुटले अश्रूंचे बांध…!

कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाने उचललं महत्त्वाचं पाऊल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या