बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | कोकणात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. शनिवारी ठाकरेंनी रायगडमधील तळीये गावाला भेट दिली. तर आज रविवारी रत्नागिरीत चिपळूनंमधील नागरिकांची भेट घेतली. यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला असून आता फिरत आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपण जर विरोधकांच्या टीकेवर लक्ष केंद्रीत केलं तर आपण काहीच करू शकणार नाही.

आपल्याला राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करायचं आहे. त्यासोबतच लोकांच्या पाठीशी उभं राहणंही गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. चिपळून दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली.

दरम्यान, सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सकारात्मक बातमी! देशातील कोरोना आला आटोक्यात; नव्या बाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाल्यावर ते फिरत आहेत- नारायण राणे

“दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल; लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही”

…म्हणून मिराबाई चानूला मिळणार लाईफटाइम पिझ्झा फ्री!

हर्षवर्धन पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणी केला?, भरणेमामांनी डिटेल सांगितलं!

मित्राची गाडी वाचवण्याच्या नादात स्वतःच वाहून गेला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More