बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्योतिरादित्य यांनी कमळ हाती घेताच त्यांच्या प्रभाव क्षेत्रातल्या 5 कलेक्टरच्या बदल्या!

नवी दिल्ली |  काँग्रेसशी 18 वर्ष प्रामाणिक राहिल्यानंतर आता भाजपात प्रवेश करून देशसेवा करायची अशी निष्ठा बाळगून काल भाजपचं कमळ हाती घेतलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचा प्रभाव असलेल्या कार्यक्षेत्रातल्या 5 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय मध्य प्रदेश राज्य सरकारने घेतला आहे.

मध्य प्रदेशमध्ये चाललेल्या राजकीय धुळवडीदरम्यान मध्य प्रदेश सरकारने 5 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ग्वाल्हेर, गुणा तसंच विदिशा या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

जितेंद्र सिंह राजे यांना निमच, एस विश्वनाथन यांना गुणा, कौशलेंद्र विक्रम यांना ग्वाल्हेर, पंकज जैन यांना विदिशा तर अनुराग वर्मा यांना हरदा या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त केलं गेलं आहे.

ग्वाल्हेर, गुणा आणि विदिशा या जिल्ह्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा प्रभाव होता. त्यांच्या मर्जीनुसारचे या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या होत्या, असा आरोप होता. ट्रान्सफर केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीमागे राजकारण आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.

ट्रेंडींग बातम्या-

ना खडसे, ना काकडे भाजपकडून राज्यसभेसाठी दुसऱ्या यादीत तिसऱ्याच नेत्याला तिकीट

सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एंट्री; केली मोठी घोषणा

महत्वाच्या बातम्या-

भाजपसाठी आनंदाची बातमी जयसिद्धेश्वर स्वामींना कोर्टाचा दिलासा!

“आदित्यसाहेबांना खासदारकीसाठी मी नाही आवडलो त्यांची चॉईस त्या बाईला”

वडिलांना कोरोना झाला म्हणून मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More