बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा

मुंबई | माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चर्चेला उधाण आलं. या निर्णयानंतर भाजप नेते तसेच खुद्द फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री काळात देवेंद्र फडणवीसांनी उत्तम काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. त्यांना उपमुख्यमंत्री पदाची इच्छा नव्हती, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी हा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी दिलं. यावेळी बोलताना  त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे  (Uddhav Thackery) यांनी माझी शिवसेना की तुझी शिवसेना न करता, जनतेचा विचार करावा, असा टोला प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या निर्णंयामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या नाराजी नाट्यावर “सरकार आपल्या हक्काचं आहे, कोणीही नाराज होऊ नये, जनतेसाठी काम करा”, असं देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

राजकीय बंडानंतर एकनाथ शिंदेनी (eknath shinde) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुरूवातीला आपण मंत्रीमंडळात नसल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी जाहीर केलं होतं. काही वेळानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले.

थोडक्यात बातम्या

उपमुख्यमंत्री होताच फडणवीस अ‌ॅक्शन मोडमध्ये, ओबीसी आरक्षणासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल

आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More