बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षाचं सरकार म्हणजे महाविकास आघाडी”

अहमदनगर | अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. स्वार्थासाठी एकत्र आलेल्या पक्षाचे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार असल्याचा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे. याशिवाय त्यांनी यावेळी आमदार निलेश लंके आणि रोहित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर पंचायत निवडणुकीमध्ये एकत्र येणार नाहीत. मात्र निवडणुका संपल्यावर एकत्र येतील. जनतेने यांचा ढोंगीपणा लक्षात घ्यावा. हे सरकार मुळातचं स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. ते आपसात भांडत असून मुळ मुद्द्यापासून दुर पळत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, राज्यात वीजबील, कोरोना, शेतकरी अनुदान असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, यातील एकही प्रश्न सरकारला मार्गी लावता आला नाही. मागच्या 2 वर्षापासून जनता महाविकास आघाडी सरकारची कामे पाहत आहे. 2 वर्षातील ही पहिलीच निवडणूक आहे. आमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र विरोधकांचा अजून उमेदवारचं ठरला नाही, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या रोहीत पवारांना मंत्रिपद देण्याबद्दल चर्चा रंगली आहे. यावरूनही सुजय विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. जिल्ह्यात 2 नाही तर 6 मंत्रिपदे देऊन जिल्ह्याला राजधानी घोषित करावी. तसेच गरज पडली तर एखाद मंत्रालयही बांधता येईल, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More