Top News

तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करताच अजय देवगण म्हणतो…

मुंबई | संपुर्ण महाराष्ट्रासह बाॅक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावून धुराळा करत आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला हरियाणा आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत चित्रपटातील प्रमुख अभिनेता अजय देवगननं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार, असं ट्विट अजयनं केलं आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून ओम राऊत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यांचा हा पहिलावहिलाच चित्रपट हिट होत असल्याचं दिसत आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाधा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडली आहे.

दरम्यान, मी मंत्रिमंडळातील सर्व नेत्यांसोबत तान्हाजी चित्रपट पाहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज ठाकरेंनी चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘आप’चे दोन आमदार गळाला लागताच जयंत पाटील म्हणतात, दिल्ली अभी दूर नही!

कागदपत्रं विचारणाऱ्यांनो आमच्या बापानं देशात 800 वर्ष राज्य केलं- ओवैसी

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या