नाशिक महाराष्ट्र

“बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा, अन् तुम्ही त्याच बापाची चेष्टा करताय”

नाशिक | बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत असल्याची टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे.

फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे म्हणत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरु असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल अजित नवले यांनी केलाय.

आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. सोशल मीडियावर कृषी कायद्यांची भलामण करणाऱ्यांचा आका का बोका वरती बसला आहे. या वाचाळवीरांना हाणण्याची गरज आहे, असं अजित नवले म्हणाले.

आपलं दुर्दैव वरती खोटारडा माणूस बसला आहे. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. मुठभर लोक सांगणार आपण शेतात काय लावलं पाहिजे. भयंकर थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असं अजित नवले यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही कुणालाही झटके देत नाही, अनेकजण शिवसेनेत यायला इच्छुक”

“शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध”

बच्चू कडू यांच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने केली आत्महत्या!

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना मिळणार अतिरिक्त भत्ता!

ब्रिटनमधून दिल्लीत आले 7 हजार प्रवासी; प्रत्येकाचा घरी जाऊन सरकार करणार तपासणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या